Neelam Gorhe । मागील काही दिवसांपासून महायुतीमधील दिग्गज नेते अडचणीत सापडले आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde), मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे संकटात सापडल्या असल्याच्या चर्चा आहेत.
आज महाविकास आघाडीकडून विधीमंडळ सचिवांकडे नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सभागृहाचा विश्वास गमावल्याने महाविकास आघाडीने गोऱ्हे यांच्याविरोधात हा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर मोठा आरोप केला होता, ज्यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. अशातच आता विरोधकांनी त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर नीलम गोऱ्हे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. परंतु, अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झाल्याने विधान परिषदेचं उपसभापतीपद धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत.
No confidence motion against Neelam Gorhe by Mahavikas Aghadi
दरम्यान, नीलम गोऱ्हे अधिवेशन सुरु झाल्यापासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झाल्या नाहीत. आजारी असल्याने त्यांना या अधिवेशनात सहभागी होता आले नाही अशी माहिती आहे. तसेच त्या उद्या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :