Share

“आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, छोट्या भुरट्या ताई…. “; Sushma Andhare यांची जहरी टीका

Sushma Andhare has criticized Rupali Chakankar and Chitra Wagh over the allegations against Jayakumar Gore.

by MHD

Published On: 

Sushma Andhare criticize Rupali Chakankar and Chitra Wagh

🕒 1 min read

Sushma Andhare । महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यावर विरोधक करत आहेत. तसेच त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी देखील केली जात आहे.

यामुळे राज्याचे राजकीय वातावरण पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने आले असल्याचे पाहायला मिळत आहेत. याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अधिकृत एक्स अकाउंटवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि भाजप आमदार महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीका केली आहे.

Sushma Andhare post on X

सुषमा अंधारे X वर लिहितात, “विषय भाजपच्या किरीटचा असो किंवा जयकुमार गोरेचा.शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता आहे. एरवी चित्रविचित्र आवाज काढत आक्रस्ताळेपणा करणाऱ्या छोट्या भुरट्या ताई सुद्धा गोरेबद्दल चकार शब्द काढत नाहीय. हे सगळे नग म्हणजे “एका माळेचे मणी अन् ओवायला नाही कुणी” असा प्रकार आहे?,” असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे यांनी नाव न घेता रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्याने वादाला नवीन तोंड फुटू शकते. महायुतीच्या या दोन्ही नेत्या सुषमा अंधारे यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Jaykumar Gore Responds to Renewed Allegations

दरम्यान, जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यामुळे विरोधकांना मोठी चपराक बसली आहे, असे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)