🕒 1 min read
Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) दिला.
यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. पण धनंजय मुंडे यांनी आपण सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारण पुढे करत राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी राजीनाम्याचे वेगवेगळे कारण सांगितल्याने त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांना टार्गेट केले जात आहे. अशातच आता मुंडेंना समाजाचा पाठिंबा कमी होताना दिसत आहे.
यावर राजकारण तसेच समाजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्याविषयी मी पहिल्या दिवशी जे वक्तव्य केले होते ते अजाणतेपणातून केले होते. तुटपुंज्या माहितीच्या आधारावर मी ते वक्तव्य केले होते,” असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे.
Namdev Shastri supports Santosh Deshmukh family
नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख कुटुंबियांना आपला पाठिंबा देत धनंजय मुंडे यांची साथ सोडली आहे की काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- David Warner ला IPL 2025 लिलावात झटका, पण दक्षिण चित्रपटसृष्टीत एंट्री निश्चित
- ‘ते’ वक्तव्य अजाणतेपणामुळे! संतोष देशमुख हत्याप्रकरणी Namdev Shastri यांची मोठी मागणी
- खातं कळलं की नाही, Aaditya Thackeray यांचा सवाल; Gulabrao Patil म्हणाले, तुमच्या बापानेच खातं दिलं होतं, सभागृहात तणाव!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










