Aaditya Thackeray vs Gulabrao Patil | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात तीव्र वाद झाला. आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांना अभ्यास करून उत्तर देण्याचा खोचक सल्ला दिला, ज्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
सभागृहात चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, “मंत्र्यांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल, तर ते राखीव ठेवावे आणि अभ्यास करून उत्तर द्यावे. त्यामुळे त्यांना खात्याची व्यवस्थित माहिती मिळेल.” अशी टीका केली.
या वक्तव्यावर संतप्त होत गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले, “अहो यांच्या बापाला (उद्धव ठाकरे) कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं,” काही वेळाने त्यांनी ‘बाप’ या शब्दाऐवजी ‘वडील’ असा उल्लेख करत शब्दफेर बदलला. मात्र, त्यावेळी सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
Aaditya Thackeray आणि Gulabrao Patil यांच्यातील वाद अधिक तीव्र
पाणीपुरवठा योजनांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी शेतीसाठी शेणखताचा वापर आणि आरओ प्लांट बसवण्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे मध्ये बोलू लागल्याने गुलाबराव पाटील यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, आणि अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला.
गुलाबराव पाटील यांनी एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. मात्र, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचा ठाकरे गटासोबत वाद वाढलेला दिसतो. या वादामुळे सभागृहातील राजकीय तणाव चव्हाट्यावर आला आहे. या घटनाक्रमामुळे विधिमंडळात वातावरण तापले असून, राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
विधानसभेतील सवांद
- आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
मंत्री नेहमी केंद्र सरकारकडे बोट ठेवत दाखवतात, मग मंत्र्यांना खातं कळालं की नाही, हा प्रश्न आहे - गुलाबराव पाटील
मला खात कळतं म्हणून तर त्याच्या बापाने मला खातं दिलं होतं - आदित्य ठाकरे
म्हणून तर तुम्ही पळून गेले होते
विधानसभा अध्यक्ष : वैयक्तिक कमेंट करू नये. ते रेकॉर्डवरून काढून टाकावे
महत्वाच्या बातम्या