Sanam Teri Kasam 2 । अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन (Mawra Hussain) यांचा सनम तेरी कसम (Sanam Teri Kasam) हा चित्रपट री-रिलीज केल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षक आता याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
याबाबत मावरा हुसैनने मोठी अपडेट दिली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसर्या भागासाठी माझ्याशी संपर्क साधला असून मी अजून स्क्रिप्ट वाचली नाही,” अशी माहिती मावरा हुसैनने दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये चित्रपट निर्माते राधिका राओ (Radhika Rao) आणि विनय सप्रू (Vinay Sapru) म्हणाले की या चित्रपटाची कहाणी केवळ दोन भागांसाठी लिहिली गेली. हेच कारण आहे की जेव्हा हा चित्रपट पहिल्या भागात संपेल तेव्हा शेवट खूप भावनिक दाखवला आहे.
Sanam Teri Kasam 2 Release date
सनम तेरी कसम या चित्रपटाच्या दुसर्या भागाची कहाणी तयार आहे आणि जवळजवळ सर्व गाणी पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
सनम तेरी कसम या चित्रपटाबद्दल अधिक सांगायचे झाले तर तब्बल नऊ वर्षांपूर्वी सनम तेरी कसम चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण त्यावेळी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नव्हती. री-रिलीज केल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या :