Datta Gade । 25 फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Swargate bus rape case) करण्यात आल्याची घटना घडली होती. यातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. तपासादरम्यान त्याच्याबद्दल दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. गाडे याच्याविरोधात शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगरमधील सुपा आणि कोतवाली पोलिस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यांमध्ये तक्रार करण्याऱ्या महिलाच आहेत. त्याच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा आहे. तो केवळ एकट्या दिसणाऱ्या महिलांना नाही तर तृतीय पंथीयांशीही संबंध ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याने एका भाजी विक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर चारचाकी गाडी थांबवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडली होती. संतापलेल्या भाजी विक्रेत्या महिलेने त्याच्या गाडीवर दगड मारल्याने त्याने तेथून पळ काढला होता.
Datta Gade targeting single women
त्याशिवाय गाडे याने नीरा या ठिकाणी जाण्यासाठी न्हावरा फाटा येथे उभ्या असलेल्या महिलेजवळ चारचाकी नेऊन तिला चौफुला येथे सोडण्याचं आश्वासन दिले. काही अंतरावर चाक पंक्चर झाल्याचं कारण सांगत त्याने चारचाकी थांबवली आणि त्या महिलेला धमकी देत तिच्याकडे असणारे दागिने लुटले. नगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या महिलेला देखील त्याने गळा दाबून दागिने लुटले होते, हे पोलीस तपासातून निष्पन्न झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले