Supriya Sule । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अजूनही विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आहेत. यामुळे राज्य सरकारवर देखील दबाव येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याच मुद्द्यांवरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. “राजकारण बाजूला सारून मी मागील दोन आठवड्यांपासून मी फडणवीसांकडे भेटीसाठी वेळ मागत आहे. तरीही मला वेळ मिळत नाही,” असा आरोप सुळेंनी केला.
“वाल्मिक कराडला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कुणी केले? जर तुम्ही मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी नियुक्तीवर कडक भूमिका घेता, तर मग धनंजय मुंडेंवर एवढे आरोप असताना त्यांच्याबाबत वेगळी भूमिका का?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “पुण्यातील स्वारगेटला जी घटना झाली (,Pune Rape Case), ज्यापद्धतीने ती हाताळली गेली ते चुकीचे आहे. गलिच्छ घटना झाली त्यानंतर संवेदनशील प्रतिक्रिया दिल्या पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपी दत्ता गाडे याला चौकात फाशी द्या,” अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
Supriya Sule on Pune Rape Case
“सगळ्यांच्या घरात लेकी-सुना आहेत. अशा गलिच्छ घटना झाल्यानंतर कोणत्याही जबाबदार व्यक्तीने संवेदनशील पद्धतीने बोलायला पाहिजे. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली,” असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :