KKR च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ मराठमोळ्या खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

by MHD
Ajinkya Rahane is the Captain of KKR in Ipl 2025

KKR । गेल्या वर्षी केकेआरने आयपीएलचे (IPL) विजेतेपद जिंकले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही हा संघ विजेतेपद जिंकणार का? याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. आयपीएलला (IPL 2025) अवघ्या काही दिवसांचे अंतर असताना संघाने कर्णधारपदाची नियुक्ती केली नव्हती.

त्यामुळे संघ कोणाला कर्णधारपद सोपवणार? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. अशातच आता संघाने आगामी हंगामासाठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. संघाने मराठमोळ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane ) याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली संघ (Kolkata Knight Riders) यंदाही विजतेपद जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान, कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे याच्यासह रिंकू सिंह याच्याही नावाची चर्चा होती. अखेर आज संघाने नवीन कर्णधार जाहीर केला आहे.

Kolkata Knight Riders IPL 2025 Full Schedule

22 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
26 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
31 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
3 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
11 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
15 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
21 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स
26 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
29 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
4 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
7 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
10 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
17 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

KKR IPL 2025 Match Where To Watch On TV?

KKR च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

KKR IPL 2025 Match Live Streaming Details

KKR चे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

KKR Squad for IPL 2025

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अँरिक नोरखिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक

महत्त्वाच्या बातम्या :

Two players were being discussed for the captaincy of KKR in the upcoming season. Finally today the team has announced the new captain.

Marathi News Cricket IPL 2025 Sports