Share

‘महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला..’; अजितदादांच्या निधनावर सचिन तेंडुलकर भावुक, क्रिकेटविश्व हादरलं!

अजित पवारांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर भावुक झाला असून, “महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला” अशा शब्दांत त्याने श्रद्धांजली वाहिली आहे.

Published On: 

Sachin Tendulkar on Ajit Pawar Death: 'महान नेता गमावला'; सचिन भावुक!

बुधवारी सकाळी राज्यावर असा काही आघात होईल, याचा विचारही कुणी केला नसेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पहाडी आवाज’ आज कायमचा शांत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील निधनाने केवळ राजकीय वर्तुळच नाही, तर क्रीडा क्षेत्रही (Sports World) सुन्न झालं आहे. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यात अजितदादांसह विमानातील सर्वांचाच जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सचिन अत्यंत भावूक झाला असून त्याने सोशल मीडियावर लिहिलंय, “महाराष्ट्राने एक महान आणि कष्टाळू नेता गमावला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझी संवेदना. ओम शांती.” सचिनच्या या शब्दांनी दादांच्या चाहत्यांचे मन हेलावून टाकले आहे.

Sachin Tendulkar on Ajit Pawar Death

केवळ सचिनच नाही, तर मुंबईकर आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यालाही या बातमीने धक्का बसला आहे. “दादांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले,” अशा शब्दांत त्याने शोक व्यक्त केला. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू आणि  काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांनी ही घटना ‘हृदयद्रावक’ असल्याचे म्हटले आहे. “ते एक मेहनती नेते होते,” अशी आठवण पठाण यांनी काढली.

भारताचे माजी कर्णधार आणि सध्या तेलंगणा सरकारमधील मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांचं खेळाडूंना प्रोत्साहन देणं नेहमीच स्मरणात राहील, त्यामुळे आज खेळाच्या मैदानातही एक उदासी दाटली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install