Datta Gade । स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर दत्ता गाडे याने अत्याचार (Pune Rape Case) केला होता. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान, सातत्याने नवनवीन गोष्टींचा खुलासा समोर येत आहे. (Crime in Pune)
दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला पोलिसांनी तब्बल एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गाडे याला पकडून देण्यात गुनाट गावातील गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पोलिसांनी जाहीर केलेले बक्षीस गुनाट गावकऱ्यांना देण्यात आले आहे. (Swargate Bus Depot Crime)
पण या बक्षिसामुळे गुनाट गावकऱ्यांमध्ये दोन मते निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. गुनाटमधील गावकऱ्यांनी बक्षिसाची रक्कम नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण दत्ता गाडे याच्यामुळे गावाची बदनामी झाली आहे, असे गावकऱ्यांचे मत आहे.
या प्रकरणी गाडे दोषी आहे की नाही हे लवकरच समोर येईल. पण काही ग्रामस्थांनी ही रक्कम स्वीकारायचा निर्णय घेतला असून ती रक्कम गावाच्या विकास निधीसाठी वापरावी असे काहींचे मत आहे.
Gunat villagers decision about reward amount for Datta Gade information
एकंदरीतच बक्षिसाच्या या रकमेवरुन गावकऱ्यांमध्ये दोन मत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुनाट गावकरी ही रक्कम नाकारणार की ती रक्कम गावच्या विकासासाठी वापरणार? हे लवकरच समजेल.
महत्त्वाच्या बातम्या :