Sandeep Kshirsagar । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला देखील वेगळे वळण लागले आहे.
याप्रकरणी आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्यावर निशाणा साधला आहे. “वाल्मिक कराड हा इतका मोठा माणूस नाही की त्याचा गुन्हा दाखल करायला 24 तास लावले, त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. राजकीय मदतीमुळे तो वाचला होता,” असा दावा क्षीरसागर यांनी केला.
“संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामधील चार्जशीट मधून जे समोर आले तेच आम्ही आधीपासून बोलत होतो. संतोष देशमुख प्रकरणांमध्ये मुख्य मास्टर माईंड आणि सुत्रधार वाल्मिक कराडच आहे,” असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
Sandeep Kshirsagar demand Dhananjay Munde resignation
“धनंजय मुंडे म्हणतात की वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय आहे. निकटवर्तीय आहे म्हणजे सगळे अधिकार त्याला दिले का? घटनाक्रम बघितला तर घुलेला कराडने फोन कधी केला, हे सगळं समोर आलं आहे. मुख्य आरोपी म्हणून कराड समोर आला असल्याने आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली.
दरम्यान, आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्य सरकारला घेरू शकतात. त्यामुळे सरकार मुंडेंचा राजीनामा घेणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :