Share

Pune Rape Case प्रकरणी पीडितेचा धक्कादायक जबाब, म्हणाली; “दादा काय करायचंय ते कर पण…”

The victim of the Pune Rape Case has filed a statement against Datta Gade with the police. This may speed up the investigation.

by MHD

Published On: 

Pune Rape Case statement of victim

Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे (Swargate Rape Case) संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला अटक केली. तसेच न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

याप्रकरणी दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पीडित तरुणीवर अत्याचार झालाच नाही. दत्ता गाडे आणि तरुणीच्या सहमतीने संबंध झाले, असा दावा दत्ता गाडे याच्या वकिलाने केला होता. अशातच आता याप्रकरणी पीडितेने जबाब नोंदवला आहे.

बलात्कारानंतर आरोपी दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली असल्याने पीडित तरुणीने त्याच्याकडे विनंती केली. दादा काय करायचं आहे ते कर पण मला जीवे मारू नको, अशी विनंती पीडित तरुणीने आरोपीला केली होती.

पोलिसांनी तरुणीचे तिकीट पुरावा जमा केले आहे. इतकेच नाही तर पोलिसांनी दत्ता गाडे वापरत असलेल्या फोनची तांत्रिक तपासणी केली आहे. या तपासणीदरम्यान पीडित तरुणी आणि दत्ता गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे.

Victim Statement in Pune Rape Case

त्यामुळे दत्ता गाडे याच्या वकिलाच्या दावा खोटा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याशिवाय एसी बसला खिडक्या नसल्याने त्यातून आवाज बाहेर येत नसल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी याची तपासणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही