Share

ठरलं ..। या दिवशी होणार Dhananjay Munde यांचा राजीनामा?

Dhananjay Munde Resign On 3 March 2025 said Karuna Munde | मुंडे यांनी स्वतः जाहीर केले होते की, जर वाल्मिक कराड दोषी ठरला, तर ते राजीनामा देतील. त्यामुळे आता त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.”

Published On: 

Resolution on Dhananjay Munde resignation at Vidrohi Sahitya Sammelan

Dhananjay Munde Resign | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ( Santosh Deshmukh murder case) पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात वाल्मिक कराडला ( Walmik Karad ) हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून नमूद करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ३  मार्च २ ० २ ५ ला राजीनामा होणार असल्याचे सांगितले आहे.

Karuna Munde यांची फेसबुक पोस्ट

करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यावर ‘3-3-2025 को राजी नामा होगा #karunadhananjaymunde’ असं लिहिलं आहे.

करुणा मुंडे यांनी दावा केला आहे की, “अजित पवार यांनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचा राजीनामा लिहून घेतला आहे. वाल्मिक कराड ( Walmik Karad ) हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले होते. त्यामुळे विरोधक आणि मी स्वतः त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आता खात्रीशीर माहिती मिळाली आहे की, ३ मार्च रोजी सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनापूर्वी मुंडे राजीनामा देतील.” याशिवाय त्यांनी असेही स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे यांनी स्वतः जाहीर केले होते की, जर वाल्मिक कराड दोषी ठरला, तर ते राजीनामा देतील. त्यामुळे आता त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.”

Dhananjay Munde Resign On 3 March 2025

करुणा मुंडे यांच्या या पोस्टनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या राजकीय संबंधांमुळे धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आता हा राजीनामा विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच घेतला जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. संतोष देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. या घटनेचा सामाजिक आणि राजकीय परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install