Share

“तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न…”; ‘त्या’ वक्तव्यावरून Pankaja Munde अंजली दमानियांच्या निशाण्यावर

Anjali Damania has criticized Donald Trump by name after Pankaja Munde statement on Beed murder case.

by MHD

Published On: 

Anjali Damania slams Pankaja Munde on Santosh Deshmukh murder case

Pankaja Munde । आज गुन्हे अन्वेषण विभागाने मकोका न्यायालयात सादर केलेल्या दीड हजार पानांच्या दोषारोपपत्रामध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) याला संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.

आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांना पत्रकारांनी वाल्मिक कराडविषयी सवाल विचारला. यावर मुंडे पत्रकारांवर भडकल्या असल्याचे पाहायला मिळाले. “मला अजून आरोपपत्राबद्दल माहिती नसल्याने जेव्हा माहिती होईल, त्यावेळी मी बोलेल. सध्या मी पुणे शहरात स्वारगेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले आहे. मला पुण्यातील प्रश्न विचारा,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंडेंच्या वक्तव्यावरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव घेत त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

“तुम्ही बीडमधल्या असून परळीला राहता. त्यामुळे तुम्हाला बीडमधील प्रश्न विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही बीडच्या लोकप्रतिनिधी असल्याने तेथील घटनांचे सवाल तुम्हालाच करणार पण त्यांचे प्रश्न ऐकून धक्काच बसला,” अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली.

Anjali Damania slams Pankaja Munde

पुढे त्या म्हणाल्या की, “जर तुम्ही अमेरिकेमध्ये फिरायला गेला तर तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारायचे का?,” असा खोचक टोला देखील दमानिया यांनी मुंडेंना लगावला आहे. यावर आता पंकजा मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install