Datta Gade । पुण्यातील स्वारगेट एसटी बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी (Swargate bus rape case) आरोपी दत्ता गाडे याला येत्या १२ मार्चपर्यंत न्यायालायाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या दत्ता गाडेची सखोल चौकशी सुरु आहे. यावेळी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच आरोपी दत्ता गाडे याचे राजकीय कनेक्शन असल्याची माहिती समोर आली होती. आता दत्ता गाडे याची गावातील इतरही स्थानिक राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच फायदा गाडे घेत होता.
गाडे याची त्याच्या गावामध्ये दहशत होती. तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत त्याने एक जणावर चाकू उगारला होता. गाडे याच्या कृत्यांना गावातील लोकही हैराण झाले होते. त्यामुळे त्याच्याशी कुणी पंगा घेण्याची हिंमत करत नव्हते.
त्यामुळे ज्यावेळी स्वारगेट अत्याचार प्रकरणात दत्ता गाडे याचे नाव समोर आले त्यावेळी गावातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना सहकार्य करत त्याचा शोध घेऊ लागले. इतकेच नाही तर पोलिसांना नागरिकांच्या मदतीने दत्ता गाडे सापडला.
Dutta Gade lawyer claims in court in Swargate rape case
दरम्यान, याप्रकरणी आरोपीच्या वकिलाने धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी आणि पीडितेची महिनाभरापासून ओळख होती. घटना घडली त्यावेळी त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार झाला, असा दावा आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :