Santosh Deshmukh । केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh murder case) कोणी? आणि कशासाठी केली? असा सवाल देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्याला पडला होता. आज आज सीआयडीने बीडच्या विशेष कोर्टात 1500 पानांचं आरोप पत्र दाखल करत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने कोर्टात सांगितले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
“आरोपपत्रात वाल्मिक कराड याचे नाव आल्याने मला आश्चर्य वाटत नाही. अमानूष पद्धतीने बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. या व्यक्तीची हिंमतच कशी झाली? यांना अमानुष वागण्याचा अधिकार कोणी दिला?,” असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
“राज्याची दोन लोकांनीच बदनामी केली आहे. कारण परळी, बीडचे लोक साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांनी राज्याची वाट लावली आहे. वाल्मिक कराड याच्या मागे कुणी तरी असल्याशिवाय तो इतका मोठा गुन्हा करूच शकत नाही,” असाही दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Supriya Sule on Santosh Deshmukh Murder Case
पुढे त्या म्हणाल्या की, “देशमुख कुटुंबाला खूप मोठी किंमत मोजावी लागली. अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. जर तो राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? यांनी दिल्लीशी संपर्क साधला का? केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का?,” असा देखील सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :