🕒 1 min read
Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिने पूर्ण होत आली आहेत. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही फरारच आहे.
संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात खरा मास्टरमाइंड कोण? असा सवाल अनेकांना उपस्थित होत होता. याबाबत आता सीआयडीने सर्वात मोठा खुलासा केला आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याला सीआयडीने (CID) याप्रकरणी मास्टरमाइंड असल्याचे सांगितले आहे.
यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आज सीआयडीने बीडच्या विशेष कोर्टात 1500 पानांचं आरोप पत्र दाखल असून यामध्ये वाल्मिक कराड याला क्रमांक 1 चा आरोपी बनवले आहे. त्यानेच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला.
त्यानंतर आरोपी विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, जयराम चाटेसह इतर साथीदारांनी देशमुखांची हत्या केली. पण या आरोप पत्रातून रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे या दोन आरोपींची नाव वगळण्यात आली आहेत. मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील तर सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी होता.
Santosh Deshmukh murder case mastermind
त्यामुळे या दोघांविरोधात आरोपपत्र का दाखल झाली असा सवाल उपस्थित होत आहे. दोघांचीही पुरवणी आरोप पत्रात नावं येतात की त्यांना मुख्य आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनवण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याने यावर देशमुख कुटुंबीय काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘या’ ठिकाणीही Datta Gade ची होती नजर? सीडीआरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर
- Manikrao Kokate यांचे पद जाणार की राहणार? आज कोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी
- Rupali Thombare यांचा खळबळजनक दावा, म्हणाल्या; “पैसे दिले नाही म्हणूनच…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










