Manikrao Kokate । अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार दंड ठोठावला होता. आज याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
माणिकराव कोकाटे यांनी दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा योग्य असल्याचे सांगत सरकार पक्षाकडून स्थगितीला जोरदार विरोध करण्यात आला होता.
कोकाटे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अविनाश भिडे यांनी सरकार पक्षाचे मुद्दे खोडत शिक्षेला अपिलाचा निकाल लागेपर्यंत स्थगितीची मागणी केली होती. यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १ मार्चपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.
आज माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. जर कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Hearing today on Manikrao Kokate petition
त्यामुळे आजच्या निकालाकडे माणिकराव कोकाटे यांच्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. तरीही अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :