🕒 1 min read
Datta Gade । पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या (Pune Rape Case) घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. तो इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का? आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. अशातच आता याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दत्ता गाडे याला पीडित तरुणीवर अत्याचार करायचा नव्हता, अशी नवीन माहिती चौकशीतून समोर आली आहे. कारण त्याला दुसऱ्याच एका तरुणीवर अत्याचार करायचा होता. पण त्याचा डाव फसल्याने त्याने पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले.
दरम्यान, या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वारगेट बस प्रशासनाने एकूण 36 सुरक्षारक्षकांची मागणी केली असून यात सहा महिला सुरक्षारक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
Swargate rape case in Pune
मंगळवारी घडलेल्या घटनेला बस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्यामुळे बसस्थानक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. दरम्यान, बस प्रशासनाच्या या निर्णयामुळे गुन्हेगारांना वचक बसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Pune Rape Case | मुलगी स्वेच्छेने बसमध्ये बसली, दोघांच्या सहमतीने संबंध झाले; वकिलाचा कोर्टात दावा
- इंग्लंडचा कर्णधार Jos Buttler कडून कर्णधारपदाचा राजीनामा
- Yogesh Kadam यांचे विधान बालिशपणाचे; शहाजी बापू पाटलांचा संताप









