Share

Pune Rape Case | मुलगी स्वेच्छेने बसमध्ये बसली, दोघांच्या सहमतीने संबंध झाले; वकिलाचा कोर्टात दावा

Shocking claim of accused Datta Gade in Pune Rape Case

Pune Rape Case |  पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 25 फेब्रुवारी रोजी एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला 72 तासांच्या आत अटक केली आणि त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले. पोलिसांनी आरोपीच्या 14 दिवसांच्या पोलीस रिमांडची मागणी केली, जी कोर्टाने मंजूर केली. आरोपीच्या वकिलांनी दावा केला की, “मुलगी स्वतःहून बसमध्ये बसली होती आणि तिच्या इच्छेनुसार संबंध झाले.” यावर सरकारी वकिलांनी विरोध करत आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस रिमांड देण्याची मागणी केली.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

आरोपीचे वकील वजीदखान बीडकर आणि साजिद खान यांनी कोर्टात सांगितले की, “मुलगी स्वेच्छेने बसमध्ये बसली होती आणि दोघांमध्ये सहमतीने संबंध झाले. आरोपीचे फोटो माध्यमांत दिसले आहेत, मग त्याला बुरखा घालून कोर्टात का आणले? आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे आरोपीला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही. माध्यमांच्या दबावामुळेच हे प्रकरण मोठे झाले असल्याचे वकिलांनी सांगितले.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

सरकारी वकिलांनी विरोध करत सांगितले की, “आरोपीने ‘ताई’ म्हणून फिर्यादीला फसवून बसमध्ये घेतले. आरोपीवर महिलांविरुद्ध आधीच 5 गुन्हे नोंदवले गेले आहेत, आणि त्यामुळे त्याचा महिलांबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.”

Pune Rape Case Dattatray Gade remanded in police custody till March 12

सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले की, “आरोपीने इतर गुन्हे केले आहेत का, याचा तपास करणे आवश्यक आहे. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचा तपास करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी 14 दिवसांची पोलीस रिमांड आवश्यक आहे.” अखेर, कोर्टाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस रिमांड मंजूर केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

Pune Rape Case Dattatray Gade remanded in police custody till March 12

Pune Crime Marathi News