Swargate Rape Case । पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. कालच या प्रकरणातील पीडित तरुणीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान तिने एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली व्यथा मांडली आणि आरोपी दत्तात्रय गाडे याला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे. पीडित तरुणीची व्यथा ऐकल्यानंतर शिंदे यांनी तिला न्यायासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दत्तात्रय गाडेचे वकील साहिल डोंगरे (Sahil Dongare) यांचे अपहरण करून त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी साहिल डोंगरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. साहिल डोंगरे यांच्यावर हल्ला का करण्यात आला? याची माहिती अजूनही समजू शकली नाही. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Attack on lawyers of Dattatray Gade
डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दत्तात्रय गाडे याचे वकील वाजीद खान यांचे साहिल डोंगरे सहायक वकील आहेत. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणात आणखी कोणती महत्त्वाची माहिती समोर येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले