Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. याप्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही फरार आहे.
अशातच आता याप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटे (Vishnu Chate) याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशमुखांच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये चाटेने हा अर्ज केला होता.
जरी विष्णू चाटेच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसला तरी नवीन अपडेटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांनी शस्त्र देऊ नये अशा पद्धतीची शिफारस केली होती. विष्णू चाटे याला शस्त्र परवाना हवा होता? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाकडून कोर्टात सादर करण्यात आलेल्या दोषारोप पत्रातील आरोपींनी संतोष देशमुख यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Vishnu Chate applied for a weapons license
हे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे. अशातच आता याप्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले