Share

मागील जन्मात Narendra Modi छत्रपती शिवाजी महाराज…” भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

A BJP MP has made a statement that Narendra Modi was Chhatrapati Shivaji Maharaj in his previous life. This has sparked a new controversy.

by MHD

Published On: 

Narendra Modi was Chhatrapati Shivaji Maharaj said Pradeep Purohit

🕒 1 min read

Narendra Modi । राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून (Tomb of Aurangzeb) वाद सुरु आहे. नागपूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपच्या खासदाराच्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.

“भाजप खासदार प्रदीप पुरोहित (Pradeep Purohit) म्हणाले, मी एका संताला भेटलो. त्यावेळी त्यांनी असे सांगितले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांच्या मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. मोदी हे प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.”

प्रदीप पुरोहित यांच्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील प्रदीप पुरोहित यांच्यावर अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्टद्वारे टीका केली.

Varsha Gaikwad Post on X

वर्षा गायकवाड X वर लिहितात, “अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे,” असा आरोप गायकवाड यांनी केला.

“या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका. शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे,” अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही