Share

Sanjay Raut यांनी सांगितला दंगलीचा नवीन पॅटर्न, म्हणाले; “आधी हिंदूवर हल्ले करून…”

Sanjay Raut has made major allegations against the BJP, RSS and the state government regarding the violence in Nagpur.

by MHD

Published On: 

Sanjay Raut Allegation on Nagpur Violence

🕒 1 min read

Sanjay Raut । छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे. नागपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “राज्यात देशात दंगली पेटवून 2029 च्या निवडणुकीला सामोरे जायचं हा निवडणुकीतला दंगल पॅटर्न सुरू झाला आहे. नागपुरमध्ये दंगल पेटवणारे कोण? त्यांना कुणाची प्रेरणा मिळत आहे?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपची (BJP) विचारधारा आहे. हिंदूंना भडकवण्यासाठी अशा दंगली घडवल्या जातात. अगोदर हिंदूंवर हल्ले केले जातात, नंतर दंगल घडवली जाते. हा एक दंगल पॅटर्न देशात नवीन निर्माण झाला आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“मोहन भागवत (Mohan Bhagwat), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) या चार लोकांनी हाता कुदळ -फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचे, विजयाचे प्रतिक नव्हते आणि नाही,” असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut Allegation on Devendra Fadnavis

पुढे ते म्हणाले की, “लोक बाहेरून येणे शक्य नाही. जर फडणवीसांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवतात, प्रचंड जाळपोळ होतोय याचा अर्थ असा आहे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फेल्युअर आहेत,” अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)