Nagpur Violence । नागपूरमधील महाल परिसरामध्ये काल रात्री उशिरा दोन गटांत हिंसाचार झाला आणि काही वेळातच दंगलखोरांनी दगडफेक केली. दंगलखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. परिस्थिती बिकट झाल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
मागील काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथे असणारी औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याची मागणी केली जात आहे. काल सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलातील (Bajrang Dal) कार्यकर्त्यांकडून शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनामध्ये मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या काही ओळी जाळल्या. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाने आंदोलन केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण अचानक संध्याकाळी दोन्ही गटाने एकमेकांसमोर येत दोन्ही बाजूने घोषणाबाजी केली.
धक्कादायक बाब म्हणजे सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवा पसरल्याने वातावरण आणखी पेटले. या अफवा कोणी पसरवल्या? याचा तपास आता सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे. नागपूरमध्ये कलम 144 लागू केले आहे.
Prohibition in Nagpur
या हिंसाचारानंतर नंदनवन, कोतवाली, पाचपावली, शांतीनगर, गणेशपेठ, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू केली आहे. वैद्यकीय कारण सोडून इतर कारणासाठी घराबाहेर पडता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :