🕒 1 min read
Nagpur violence । खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे तीव्र पडसाद नागपूरमध्ये उमटले आहेत. नागपूर हिंसाचारामागचा मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.
याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. फहीम खान (Fahim Khan) हा नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (Minority Democratic Party) शहराध्यक्ष असून तो लोकांना भडकवण्याचे काम करत होता.
औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने त्याचा निषेध करण्यासाठी फहीम खानच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने जमावाकडून कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर करण्यात आला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी ४६ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी ३६ आरोपींना काल पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. ६ आरोपींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
Nagpur Violence Woman Police Office Molested
धक्कादायक बाब म्हणजे हिंसाचारातील अंधाराचा फायदा घेत आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करुन वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला अशीही माहिती समोर आली आहे. काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dattatray Gade च्या वकिलांचे अपहरण की… सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर
- “रेखाचे फार नखरे असायचे, Amitabh Bachchan यांच्यासोबतही…”, ज्येष्ठ अभिनेत्याने केला मोठा खुलासा
- IPL मध्ये फक्त खेळाडूच नाही तर अंपायरदेखील होतात मालामाल, किती मिळतो पगार? जाणून घ्या









