Share

“रेखाचे फार नखरे असायचे, Amitabh Bachchan यांच्यासोबतही…”, ज्येष्ठ अभिनेत्याने केला मोठा खुलासा

by MHD
Actor Ranjit revelation about Rekha and Amitabh Bachchan

Amitabh Bachchan । अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या खासगी आयुष्याबद्दलची माहिती सगळ्यांना आहे. अनेकदा त्यांचे नाव ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Rekha and Amitabh Bachchan) यांच्यासोबत जोडले जायचे. त्यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगत असायची. अनेकदा रेखा यांनी देखील अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं.

1970 मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचे नाव असायचे. त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. अशातच आता लोकप्रिय खलनायक रणजीत (Ranjit) यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या रणजीत यांनी फिल्ममेकिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांनी रेखाला एका चित्रपटासाठी साइन केले होते, अशी माहिती रणजीत यांनी दिली. “तू माझी चांगली मैत्रीण असून मी जर तुला साइन करत असेन, तर मला तुझी एका चित्रपटाची फी सांग, मी तुला तेवढे देईन,” असे रणजीत यांनी रेखा यांना विचारले होते.

महत्त्वाचे म्हणजे रेखा यांनी रणजीत यांना चित्रपटाची फी सांगितली, पण काही दिवसांनी त्यांना समजले की त्या एका दुसऱ्या चित्रपटासाठी पाच लाख रुपयांनी कमी रकमेत साइन झाल्या आहे. रेखा निर्मात्यांना त्यांच्या घरी खूप वाट पाहायला लावत असायच्या. रणजीत यांची संपूर्ण टीम बाहेर उभी होती, पण रेखाने त्यांना आत बोलावले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

Actor Ranjit on Rekha and Amitabh Bachchan relation

त्यावेळी दुसऱ्या एका सिनेमाचेही शूटिंग करत असल्याने रेखा यांनी रणजीत यांना सायंकाळी शूटिंग करण्यास नकार दिला. पण रणजीत यांना हे पटले नाही. तसेच त्यावेळी रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे संबंध चांगले नव्हते. नंतर ते चांगले झाले. इतकेच नाही तर रेखा यांना कोरिओग्राफरही पटत नव्हता. त्यामुळे त्याची बदली करण्यात आली, पण रेखा यांचे फार नखरे असल्याने रणजीत यांनी त्यांच्याकडून साइनिंग अमाउंट परत घेऊन सिनेमा पुढे न बनवण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या :

Popular actor has made a big revelation during an interview about Rekha and Amitabh Bachchan.

Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now