🕒 1 min read
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासोबतचा एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे. ‘शहंशाह’ फेम दिग्दर्शक टीनू आनंद यांनी एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान माधुरीकडे वादग्रस्त सीनसाठी विनंती केली होती. त्यांनी तिला सांगितले की, “तुला ब्लाउज काढावं लागेल.” ही मागणी ऐकताच माधुरी चक्रावून गेली व सेटवरून निघून गेली.
टीनू आनंद यांनी एका रेडिओ मुलाखतीत हा किस्सा उघड केला. त्यांनी स्पष्ट केलं की, हा सीन चित्रपटाच्या कथेसाठी महत्त्वाचा होता आणि माधुरीला आधीच याची कल्पना दिली होती. सुरुवातीला सहमती दिल्यानंतर माधुरीने प्रत्यक्ष शूटिंगला नकार दिला. 45 मिनिटे ड्रेसिंग रूममध्ये राहिल्यानंतर तिने स्पष्ट नकार दिला.
“You have to take off your blouse”, Madhuri was shocked by the director’s demand
या घटनेमुळे सेटवर तणावाचं वातावरण निर्माण झालं. दिग्दर्शक आणि निर्माते तिच्यावर नाराज झाले, तर अमिताभ बच्चन यांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर माधुरीने सीन करण्यास होकार दिला. मात्र, निर्मात्यांशी वाद झाल्यामुळे चित्रपट पुढे निघाला नाही. या घटनेनंतर माधुरीने पुन्हा कधीही टीनू आनंद यांच्यासोबत काम केलं नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही”; जगाचा निरोप घेण्यापूर्वी लक्ष्याने काढली होती या खास दोस्तांची आठवण
- छगन भुजबळ यांच्याकडून खंडणीची मागणी करणाऱ्या बनावट ‘आयकर अधिकाऱ्याला’ रंगेहाथ अटक
- छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्या इसमाला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now