🕒 1 min read
नाशिक: माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपीने भुजबळ यांना धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी दिली होती. प्रकरण गांभीर्याचे असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून काढले आणि अटक केली. सध्या आरोपीकडून अधिक तपास सुरू आहे.
Man Arrested for Demanding ₹1 Crore Extortion from Chhagan Bhujbal
छगन भुजबळ हे राज्यातील प्रसिद्ध नेते असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याप्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. पोलिसांनी यामध्ये कोणतेही राजकीय कारण आहे का, याचाही तपास सुरू केला आहे.
छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ ने सापळा रचून करंजाळी येथील एका हॉटेलमध्ये अटक केली आहे. आरोपी राहुल दिलीप भुसारे हा स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत होता. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, नेत्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टिप – बातमी अपडेट होत आहे.. आणखी काही महत्वाची माहिती समोर येऊ शकते….!
📌 महत्वाच्या बातम्या
- एसटी चालकांकडून वेगमर्यादा उल्लंघनाच्या प्रकरणात लाखो दंड वसुली
- ‘अल्लाहने पाकिस्तानची शेपटी सरळ करावी, नाहीतर…’ ओवेसीची पाकला धमकी
- गुंडाराजाविरोधात बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा! अंजली दमानियांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now