🕒 1 min read
हैदराबाद | प्रतिनिधी: एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवत स्पष्ट इशारा दिला आहे. पहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात बोलताना त्यांनी म्हणाले की, “प्रार्थना करा, अल्लाहने त्यांची शेपटी सरळ करावी, नाहीतर वेळ आली तर ती आपल्यालाच सरळ करावी लागेल.”
हैदराबाद येथील हज हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात हज यात्रेकरूंशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानच्या कटकारस्थानावर भाष्य करत देशातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नसल्याचे ठामपणे सांगितले. ओवेसी यांनी सांगितले की दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना कलमा म्हणायला लावले. जे म्हणू शकले नाहीत, त्यांना लक्ष्य करण्यात आले. हे पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर आखलेलं षड्यंत्र होतं, पण भारताने ते उधळून लावलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Owaisi slams Pakistan over Pahalgam attack
या पार्श्वभूमीवर भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर आणि ओवेसी यांचे कौतुक केले आहे. “राजकीय मतभेद असूनही देशाच्या बाजूने उभं राहणं ही खरी देशभक्ती आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, केंद्र सरकार 22-23 मे रोजी सर्वपक्षीय खासदारांना आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर पाठवणार आहे. अमेरिका, इंग्लंड, कतार, दक्षिण आफ्रिका, यूएई या देशांमध्ये हे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या दहशतवादी भूमिकेवर जागतिक पातळीवर आवाज उठवणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गुंडाराजाविरोधात बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा! अंजली दमानियांची मागणी
- मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
- कोरोना पुन्हा डोके वर काढतोय! कोव्हिड-19 ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, प्रशासन सतर्क
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now