🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी: कोरोना व्हायरसच्या भयानक आठवणींना लोक विसरू पाहत असतानाच आशिया खंडात पुन्हा एकदा कोव्हिड-19च्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. हाँगकाँग, सिंगापूरसह चीन आणि थायलंडमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतालाही सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर आणि टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याची वेळ पुन्हा आली आहे.
Covid 19 Cases Rise in Hong Kong, Singapore
हाँगकाँगमध्ये सर्वाधिक वाढ
हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे प्रमुख डॉ. अल्बर्ट औ यांनी सांगितले की, “मे महिन्यात समोर आलेली रुग्णसंख्या गेल्या वर्षभरातील सर्वाधिक आहे.” शहरात संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे.
सिंगापूरमध्ये 28 टक्क्यांनी वाढ
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड रुग्णांमध्ये 28% वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुन्हा गडबड सुरू झाली आहे.
चीन व थायलंडही धोक्याच्या सावटाखाली
चायना सीडीसीच्या अनुसार, चीनमध्ये गेल्या पाच आठवड्यांत रुग्णालयात दाखल होणारे कोरोना रुग्ण दुप्पट झाले आहे. तर थायलंडमध्ये सोंगक्रान उत्सवानंतर समूह संसर्गाची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील यंत्रणाही अलर्टवर आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंच्या वागणुकीने दुखावलो होतो – संजय राऊत
- ‘धर्मामुळे गृहमंत्रीपद मिळालं नाही!’; हसन मुश्रीफबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
- सपकाळ-ठाकरे भेटीमुळे हालचालींना वेग; “तोपर्यंत महाविकास आघाडी कायम”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










