🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या “नरकातला स्वर्ग” या पुस्तकात राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याविषयी काही भावनिक गोष्टी उघड झाल्या आहेत. राजकीय संघर्षाच्या काळात राज ठाकरेंकडून आधाराची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही, याचे संजय राऊतांना दुःख झाले असल्याचे पुस्तकात त्यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत आणि राज ठाकरे यांचे संबंध शिवसेनेच्या काळात अत्यंत जवळचे होते. मनसे स्थापनेनंतरही दोघांमध्ये स्नेह कायम होता. मात्र, संजय राऊत यांच्याविरुद्ध ईडीने कारवाई केल्यानंतर राज ठाकरे यांनी “राऊत यांनी एकांतात बोलण्याची सवय लावून घ्यावी” अशी टीका केली होती. यावर संजय राऊत म्हणतात, “राज आणि माझ्यात जिव्हाळ्याचं नातं होतं. मी तुरुंगात गेल्यावर त्यांनी किमान एक फोन तरी करावा, अशी माझी माफक अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही.”
Sanjay Raut reveals emotional pain caused by Raj Thackeray
या विधानातून संजय राऊत यांचं मनोमन दु:खी होणं स्पष्ट होतं. नरकातला स्वर्ग या पुस्तकातील या भागामुळे, त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्यात आता दुरावा निर्माण झाला असल्याचं संकेत मिळत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘धर्मामुळे गृहमंत्रीपद मिळालं नाही!’; हसन मुश्रीफबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
- सपकाळ-ठाकरे भेटीमुळे हालचालींना वेग; “तोपर्यंत महाविकास आघाडी कायम”
- पाकिस्तानने दिली शस्त्रसंधीची अंतिम मुदत; भारत-पाक युद्धाचा धोका वाढतोय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now