🕒 1 min read
मुंबई: राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेलं शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या पुस्तकात महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून गृहमंत्रीपदासाठीच्या मागण्या आणि त्यामागील शरद पवार यांची रणनीती यावर मोठे खुलासे करण्यात आले आहे.
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांसारख्या नेत्यांची नावं गृहमंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र, पवारांना मुस्लीम नेत्यावर होणाऱ्या संभाव्य टीकेची भीती वाटत होती, म्हणूनच हसन मुश्रीफ यांच्यासारखा योग्य नेता बाजूला पडला असल्याचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात सांगण्यात आला आहे.
Why Hasan Mushrif was denied Home Ministry? Sanjay Raut reveals
शेवटी ‘विदर्भातून नवा प्रयोग’ या विचाराने अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी गृहखातं यशस्वीपणे सांभाळलं. मात्र नागपूरमधील वाढता प्रभाव आणि त्याला विरोधी सत्ताकेंद्राने केलेला विरोध यामुळे त्यांच्या अडचणी सुरू झाल्या, असंही या पुस्तकात नमूद आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानने दिली शस्त्रसंधीची अंतिम मुदत; भारत-पाक युद्धाचा धोका वाढतोय?
- ठाकरे गटाला आणखी एक धक्का, विदर्भातील बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- खासदार करतो तर करतोच, काटा काढतो तर काढतोच!; अजित पवारांची तुफान फटकेबाजी









