🕒 1 min read
इंदापूर (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत जोरदार फटकेबाजी केली. “मी शब्दाचा पक्का आहे. काही ठरवलं की ते करून दाखवतो,” असं ठासून सांगत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की, पाणीप्रश्न आणि कारखान्याचं भवितव्य हे दोन्ही मार्गी लावणारच.
मी शब्दाचा पक्का आहे, एखाद्याला सांगितलं की खासदार करतो तर करतोच. मी एखाद्याला सांगितलं की याचा काटा काढतो, तर त्याचा काटा काढतोच. एखाद्याला सांगितलं की याला पाडतो, तर त्याला पाडतोच… अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
If I Say MP, It Happens – I Remove Thorns Too! – Ajit Pawar
इंदापूरमधील जुने प्रश्न, विशेषतः पाण्याच्या टंचाईचा मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला आणि सांगितलं की, “लाकडी निंबोडी प्रकल्प, जानाई-शिरसाई योजनेतून बंद पाईपलाईनने पाणी आणलं जात आहे. 500 कोटींचा निधी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ठेवला आहे, जेणेकरून अचूक नियोजन करता येईल.”
छत्रपती साखर कारखान्याबाबत अजित पवार म्हणाले, “हा कारखाना मागील 10 वर्षे जी मंडळी चालवत होती, त्यांना न घेता नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे. कोणताही संचालक गाडी घेणार नाही, पगार मागणार नाही.” तसेच सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचं आश्वासन दिलं.
अजित पवार यांनी इंदापूर, बारामती व दौंड या भागांतील पाणीवाटपाचे निर्णय, कालव्यांचं आच्छादन, आणि कृषी सिंचन प्रकल्प यांचा उल्लेख करत “पाणी म्हणजे जीवन” हे अधोरेखित केलं. शेवटी, “मी मतं मागायला आलो असलो तरी कामं करून दाखवणारच,” असं स्पष्ट करत त्यांनी कारखान्याच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मिशिगनमधील लष्करी तळावर ISIS चा मोठा हल्ला टळला; FBI ची वेळेवर कारवाई
- शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? सुनील तटकरे म्हणाले – “ना प्रस्ताव, ना चर्चा!”
- भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा 39 वर्ष जुना पुतळा हटणार; नव्या भव्य स्मारकासाठी 10 कोटींचा निधी मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












