🕒 1 min read
रायगड – शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. “ना कोणताही प्रस्ताव आला आहे, ना कोणतीही वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे,” असं स्पष्ट विधान त्यांनी केलं आहे. ते रायगडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असताना, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना अधिक बळ मिळालं. मात्र सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत ही शक्यता फेटाळून लावली आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar Reunion Talk Denied by Tatkare
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “शरद पवार साहेबांनी जर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला पाठिंबा दिला असता, तर ते आज राष्ट्रपतीच्या पदावर विराजमान झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन जर एनडीएला पाठिंबा देत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करतो.”
📌 महत्वाच्या बातम्या
- भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा 39 वर्ष जुना पुतळा हटणार; नव्या भव्य स्मारकासाठी 10 कोटींचा निधी मंजूर
- ट्रम्प लिजेंड, पण मोदी लिजेंडचे बाप म्हणणारी कंगना काही तासांत गप्प का झाली? कारण ऐकून धक्काच बसेल!
- पाकिस्तान उभा राहतो तिथूनच भिकाऱ्यांची रांग सुरू होते; राजनाथ सिंह यांचा जहरी प्रहार