Share

भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा 39 वर्ष जुना पुतळा हटणार; नव्या भव्य स्मारकासाठी 10 कोटींचा निधी मंजूर

Chhatrapati Shivaji Maharaj’s 39-year-old statue at Bhiwandi Chowk to be replaced with a grand new monument. Government sanctions ₹10 crore for reconstruction, relocation begins May 16.

Published On: 

Chhatrapati Shivaji Maharaj’s 39-year-old statue at Bhiwandi Chowk to be replaced with a grand new monument. Government sanctions ₹10 crore for reconstruction, relocation begins May 16.

भिवंडी | शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्रस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 39 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला अश्वारूढ पुतळा लवकरच हटविण्यात येणार आहे. त्याऐवजी नव्याने भव्य आणि मजबूत पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, 1986 मध्ये उभारलेला पुतळा सध्याच्या स्थितीत झिजलेला असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे हा पुतळा 16 मेच्या पहाटे स्थलांतरित करण्यात येणार असून, दोन दिवसांत चौथऱ्याचेही निष्कासन होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj’s historic statue in Bhiwandi

नवीन पुतळा अधिक आकर्षक, भव्य आणि काळाच्या कसोटीला टिकणारा असेल. कामाची जबाबदारी सागर कन्स्ट्रक्शन कंपनी, उल्हासनगर यांना देण्यात आली आहे. या बदलाबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी, शिवरायांचा वारसा अधिक प्रभावीपणे पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यामागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही