‘राजा शिवाजी’ सोडला, रितेशशी पंगा घेतला? रवी जाधव यांनी सगळंच सांगून टाकलं; म्हणाले, “१२ कोटींचं स्वप्न…”

Director Ravi Jadhav denies rumors of a rift with Riteish Deshmukh over quitting ‘Raja Shivaji’, Raja Shivaji Movie praising the film’s massive scale and vision.

Published On: 

Director Ravi Jadhav denies rumors of a rift with Riteish Deshmukh over quitting 'Raja Shivaji', praising the film's massive scale and vision.

सिनेमाच्या या झगमगत्या दुनियेत दोन मित्रांमध्ये ‘इगो’चे वार झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. त्यातच विषय जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित भव्य सिनेमाचा असेल, तर चर्चांना उधाण येणारच! अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) या चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून सध्या असेच तर्कवितर्क लढवले जात होते. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी हा सिनेमा का सोडला? रितेश आणि रवी यांच्यात खटके उडाले का? या प्रश्नांनी चाहत्यांना ग्रासले होते. पण आता खुद्द रवी जाधव यांनीच समोर येत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Riteish Deshmukh Movie Raja Shivaji 

एका पॉडकास्टमध्ये बोलताना रवी जाधव यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्यात आणि रितेशमध्ये कोणताही वाद नाही. ते म्हणाले, “माझ्यात आणि रितेशमध्ये एकही शब्दाचं भांडण नाही. मी शूटिंगला गेलो होतो, रितेश ज्या पद्धतीने स्वतःला झोकून देऊन हा सिनेमा बनवतोय, त्याला हॅट्स ऑफ!”

रवी जाधव यांनी सिनेमा सोडण्याचं खरं कारणही सांगितलं. २०१४-१५ मध्ये जेव्हा त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं, तेव्हा बजेट अवघं १२-१५ कोटी होतं. पण आज ‘जिओ स्टुडिओ’ आणि रितेश देशमुख ज्या भव्य स्केलवर हा सिनेमा बनवत आहेत, ती कल्पनाच वेगळी आहे. “शिवरायांचा सिनेमा बनतोय, त्याच्या आड कोणीही येऊ नये. आपण सर्वांनी त्यात सहभागी झालं पाहिजे,” अशी प्रांजळ भूमिका त्यांनी मांडली.

रवी जाधव यांचा हा मोठेपणा पाहून रितेश देशमुखही भारावून गेला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं, “जेव्हा मैत्री असते, तिथे समजूतदारपणा असतो. रवी, तू माझा फेव्हरेट आहेस. हा माझा सिनेमा नाही, तर ‘आमचा’ सिनेमा आहे.”

दोघांच्या या संवादाने हे सिद्ध झालंय की, ‘राजा शिवाजी’साठी संपूर्ण मराठी इंडस्ट्री एकवटली आहे. आता हा भव्य सिनेमा पडद्यावर कधी येतो, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही