Share

‘आलास का रे ब्रुस ली?’; मातोश्रीवर बाळासाहेब कोणाला म्हणायचे ‘असं’? अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!

Amit Thackeray recalls childhood memories with Balasaheb Thackeray, revealing his grandfather used to call him ‘Bruce Lee’. He also explains why he joined politics during MNS’s tough times.

Published On: 

Amit Thackeray recalls childhood memories with Balasaheb Thackeray, revealing his grandfather used to call him 'Bruce Lee'. He also explains why he joined politics during MNS's tough times.

मुंबई – ठाकरे कुटुंबातील ‘मातोश्री’ आणि ‘राजगड’ यांच्यातील दुरावा उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय, पण या राजकीय संघर्षाच्या पलीकडे आजोबा आणि नातू यांच्यातलं नातं नेमकं कसं होतं? बाळासाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यातील ‘त्या’ खास केमिस्ट्रीचा एक किस्सा आता समोर आला आहे, जो ऐकून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच स्मितहास्य उमटेल.

Balasaheb Thackeray call Amit Thackeray ‘Bruce Lee’

मनसे नेते अमित ठाकरे यांनी एका कार्यक्रमात आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “माझे आजोबा (Balasaheb Thackeray) नक्की कोण होते, हे मला खूप उशिरा समजलं,” असं अमित यांनी प्रांजळपणे कबूल केलं. लहानपणी मातोश्रीवर गेल्यावर तिथे तेव्हा राजकीय बोजा नसायचा. “माझे डोळे लहानपणी खूप बारीक होते, त्यामुळे आजा (बाळासाहेब) मला बघताच ‘काय रे आलास का ब्रुस ली?’ अशी हाक मारायचे,” ही आठवण सांगताना अमित ठाकरेंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं.

लहानपणी आपण आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री किती घट्ट होती, हे ही त्यांनी सांगितलं. “आम्ही आदित्यकडेच ‘बॅटमॅन’ सिनेमा एकत्र पाहिला होता,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, नंतर राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि या भेटीगाठी थांबल्या, हे सांगताना अमित थोडे भावूक झाले.

“बापाला एकटं पडू द्यायचं नव्हतं…”

राजकारणात का आलात? या प्रश्नावर अमित ठाकरेंनी दिलेलं उत्तर कोणत्याही मुलाला भावणारं आहे. ते म्हणाले, “जेव्हा मनसेचे १३ आमदार होते, नाशिकमध्ये सत्ता होती, तेव्हा मी राजकारणात आलो नाही. पण २०१४ नंतर जेव्हा पक्षाला उतरती कळा लागली, तेव्हा ‘माझ्या वडिलांना (Raj Thackeray) मला एकटं पाडायचं नव्हतं’, म्हणून मी राजकारणात उतरलो.” कठीण काळात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठीच आपण सक्रिय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

इतकेच नाही तर, ठाकरेंच्या संपत्तीवर होणाऱ्या आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. “गेल्या १० वर्षांपासून आम्ही सत्तेत नाही, आमची कमाई व्यवसायातून आहे,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना गप्प केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही