Share

“वाटलं किशमिश येईल, पण…” मुलगी न झाल्याचं दु:ख? भारतीने भर सेटवर पती हर्षची ‘पोलखोल’ केली!

Comedian Bharti Singh returns to work just 20 days after delivery; jokes about wanting a girl but getting a second son nicknamed ‘Kaju’.

Published On: 

Comedian Bharti Singh returns to work just 20 days after delivery; jokes about wanting a girl but getting a second son nicknamed 'Kaju'.

मुंबई – “बाळंतपणानंतर किमान काही महिने आराम हवा,” असं डॉक्टर आणि घरचे सांगतात. पण ही ‘कॉमेडी क्वीन’ काही थांबायला तयार नाही! डिलिव्हरीनंतर अवघ्या २० दिवसांत सेटवर हजेरी लावून तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. होय, आपण बोलतोय सर्वांची लाडकी भारती सिंग (Bharti Singh) बद्दल. १९ डिसेंबरला दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर भारती आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘लाफ्टर शेफ्स ३’ च्या सेटवर दाखल झाली आहे.

“वाटलं किशमिश येईल, पण…”

सेटवर पोहचताच पापाराझींनी भारतीला घेरले आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. पण इथेही भारतीचा विनोदी अंदाज पाहायला मिळाला. दुसऱ्यांदाही मुलगा झाल्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “वाटलं होतं किशमिश येईल, पण पुन्हा काजूच आला.” घरात सध्या धाकट्याला लाडाने ‘काजू’ म्हणूनच हाक मारली जाते. त्यामुळे गोला-काजूची जोडी आता घरात धुमाकूळ घालणार हे नक्की.

Comedian Bharti Singh returns to work

मुलगी न झाल्याबद्दल भारतीने थेट पती हर्ष लिंबाचियावर (Harsh Limbachiyaa) खापर फोडले. पापाराझींशी बोलताना ती मिश्किलपणे म्हणाली, “मुलगी नाही झाली तर मी काय करू? ही सगळी हर्षची चूक आहे. मुलगा होणार की मुलगी हे पुरुषावर अवलंबून असतं ना!” यावर हर्षनेही “पुढेही सावन येणारच आहे,” असं म्हणत हशा पिकवला.

जेव्हा एकाने गंमतीत विचारलं की ‘किशमिश’ (मुलगी) नंतर येईल का? तेव्हा भारतीने कपाळाला हात लावला. ती हसत म्हणाली, “अरे, हेच करत बसू का? मला शूटिंगपण असते ना.” सध्या तरी भारती आणि हर्षने ‘काजू’चा चेहरा जगाला दाखवलेला नाही, पण डिलिव्हरीनंतर इतक्या लवकर कामावर परतल्याबद्दल भारतीच्या ‘वर्किंग मॉम’ स्पिरिटचं सर्वत्र कौतुक होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install