शाहीन आफ्रिदीची मोठी वल्गना; भारताला दिला थेट इशारा, म्हणाला – “आम्ही मैदानातच बघून घेऊ!”

Shaheen Afridi criticizes India for refusing handshakes during Asia Cup 2025 and warns of a strong response on the field in the upcoming T20 World Cup clash.

Published On: 

Shaheen Afridi criticizes India for refusing handshakes during Asia Cup 2025 and warns of a strong response on the field in the upcoming T20 World Cup clash.

मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसतो, तर तो एक ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ असतो. त्यातच आता आशिया कपमधील ‘हँडशेक’ वाद ताजा असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) भारताला उघडपणे आव्हान दिलं आहे. भारताने खेळभावना पायदळी तुडवल्याचा कांगावा करत शाहीनने टी-20 वर्ल्डकपपूर्वी (T20 World Cup 2026) टीम इंडियाला थेट इशाराच दिला आहे.

Shaheen Afridi Warns Indian Team

नेमकं काय म्हणाला शाहीन?

आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन (Handshake) करण्यास नकार दिला होता. यावरून रडगाणं गात शाहीनने भारतावर खापर फोडलं आहे. “सीमेपलीकडच्या लोकांनी (भारताने) खेळाडूवृत्तीच्या विरोधात काम केलं आहे. पण आमचं काम क्रिकेट खेळणं आहे. आम्ही याचं उत्तर मैदानातच देऊ,” असे वक्तव्य शाहीनने केले आहे. राजकीय तणावाचा परिणाम खेळावर होऊ नये, असे सल्ले द्यायलाही तो विसरला नाही.

जखमेवर मीठ चोळणारा इतिहास

शाहीनने कितीही वल्गना केल्या तरी आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने आहे. टी-20 मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचे शेवटचे पाचही सामने गमावले आहेत. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीनदा लोळवलं आणि फायनलही जिंकली.

भारताने जिंकलेली आशिया कपची ट्रॉफी अद्याप स्वीकारलेली नाही, कारण ती पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार होती. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि भारतीय संघाने यासाठी स्पष्ट नकार दिला होता.

व्हॅलेंटाईन डेला ‘कांटे की टक्कर’

आता पुन्हा एकदा कोलंबोच्या मैदानात हे दोन कट्टर वैरी आमनेसामने येणार आहेत. 14 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला शाहीन भारताला रोखणार की भारतीय फलंदाज पुन्हा एकदा त्याची धुलाई करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि कंपनी शाहीनच्या या इशाऱ्याला बॅटने उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही