Ambernath- राजकारणात मैत्री आणि दुश्मनी सोयीनुसार बदलत असते, याचा प्रत्यय ठाण्यात पुन्हा एकदा आलाय. अंबरनाथमध्ये विकासाच्या नावाखाली काँग्रेस आणि भाजप जवळ आले, पण या ‘दोस्ताना’ची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागली आहे. पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करताच काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी थेट ‘हात’ सोडून ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसने भाजपसोबत स्थानिक पातळीवर ‘अंबरनाथ विकास आघाडी’ करत युती केली होती. मात्र, हे ‘मैत्र’ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना रुचलं नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, भाजपशी घरोबा करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे आणि अध्यक्ष प्रदीप पाटील यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. “आम्हाला विचारल्याशिवाय भाजपसोबत गटबंधन कसे केले?” असा जाब विचारत ही कारवाई करण्यात आली होती.
11 Congress corporators in Ambernath join BJP
निलंबनाची कारवाई होताच या नगरसेवकांनी माघार घेण्याऐवजी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजप नेते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, भाजपची ताकद मात्र वाढली आहे.
एकीकडे काँग्रेस फुटत असताना, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपला कोंडीत पकडलं आहे. “काँग्रेसने आपल्या फुटीरांवर कारवाई केली, पण भाजप काँग्रेससोबत जाणाऱ्या त्यांच्या नगरसेवकांवर कारवाई का करत नाही?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, अकोटमध्ये भाजपने चक्क एमआयएम (MIM) सोबत युती केल्याचा उल्लेख करत, “हे दोन्ही कट्टरवादी पक्ष पडद्याआड एकच आहेत, हेच यातून सिद्ध होतं,” असा घणाघातही सावंतांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महेश मांजरेकर मुंबई सोडायला तयार? मुलाखतीत राज-उद्धवसमोरच मोठं विधान; म्हणाले, “मला लाज वाटते…”
- टीम इंडियाच्या कॅम्पमधून पंत ‘गायब’? रोहित-विराट पोहोचले, पण ऋषभ कुठे अडकला? कारण आलं समोर!
- पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का! ऐन निवडणुकीत ‘या’ मित्रपक्षाची माघार; म्हणाले – “आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी नाही!”













