🕒 1 min read
मुंबई– ‘स्वप्नांच्या नगरीत’ आता श्वास घेणंही मुश्कील झालंय का? हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडलाय, पण एका दिग्दर्शकाने थेट मुंबई सोडण्याची तयारी दर्शवून सर्वांनाच धक्का दिला आहे. निमित्त होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक संयुक्त मुलाखतीचं! पण या मुलाखतीत प्रश्न विचारणारे दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीच असं काही विधान केलं की, उपस्थित नेतेही क्षणभर विचार करू लागले.
“मला लाज वाटते…”
मुंबईच्या सध्याच्या अवस्थेवर बोट ठेवताना मांजरेकर अत्यंत उद्विग्नतेने म्हणाले, “एक मुंबईकर म्हणून जेव्हा मी घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत.” त्यांनी थेट सांगितलं की, जर मला कुणी पर्याय दिला की कुठं तरी दुसरीकडं जा, तर मी लगेच मुंबई सोडून जाईन. कारण आज घराबाहेर पडल्यावरही त्रास होतो.
Is Mahesh Manjrekar ready to leave Mumbai?
मांजरेकरांनी मुंबईची तुलना एका फुग्याशी केली. ते म्हणाले, “एखाद्या फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरली तर काय होईल? तशीच मुंबईची अवस्था झाली आहे.” आज मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १८३ वर पोहोचला असून, शहराची लोकसंख्या २ कोटी ३१ लाखांच्या घरात गेली आहे. ही गर्दी आणि प्रदूषण पाहून जीव गुदमरतोय, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लगेच भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ही विकासाची गती नाही, तर विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकासामुळेच मुंबईची हवा खराब झाली आहे.”
मांजरेकरांनी फक्त समस्या मांडली नाही, तर एक परखड मतही व्यक्त केलं. “मुंबईत आता विकासाचीही जागा उरलेली नाही. आपण ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड घेतोय. त्यामुळे जे आलेत त्यांना राहू द्या, पण येणारे लोंढे आता तरी थांबवायला पाहिजेत,” असं त्यांनी निक्षून सांगितलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘किंग’ कोहलीने अचानक घेतली माघार; दिल्लीच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही, कारण काय?
- श्रद्धा कपूर होणार ‘मोदी’ कुटुंबाची सून? लग्नाच्या प्रश्नावर अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिलं उत्तर; म्हणाली, “मी…”
- ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची बिग बॉसमध्ये एन्ट्री? म्हणाली…..शुभेच्छांसाठी धन्यवाद..
- केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटतेय? खोबरेल तेलात मिसळा फक्त ‘ही’ १ गोष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












