‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची बिग बॉसमध्ये एन्ट्री? म्हणाली…..शुभेच्छांसाठी धन्यवाद..

Actress Kajal Kate clarifies rumors about entering Bigg Boss Marathi 6 but deletes the Instagram post later, creating suspense among fans.

Published On: 

Actress Kajal Kate clarifies rumors about entering Bigg Boss Marathi 6 but deletes the Instagram post later, creating suspense among fans.

Bigg Boss Marathi 6 | बिग बॉसच्या घरात कोण जाणार आणि कोण बाहेर राहणार, यावरून सध्या सोशल मीडियावर सट्टाबाजार तापलाय. स्पर्धकांच्या याद्या व्हायरल होत असतानाच एका लाडक्या अभिनेत्रीने अशी काही पोस्ट टाकली आणि नंतर ती डिलिट केली की, चाहत्यांच्या डोक्याचा पार भुगा झालाय! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) सध्या याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

११ जानेवारीचा मुहूर्त आणि चर्चांना उधाण येत्या ११ जानेवारीपासून महाराष्ट्राचा लाडका ‘भाऊ’ अर्थात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचे दार उघडणार आहे. कालच रितेशने घरात १६ हून अधिक स्पर्धक असणार असल्याचा बॉम्ब टाकला होता. या यादीत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफालीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली काजल काटे हिचं नाव आघाडीवर होतं.

Actress Kajal Kate enters Bigg Boss Marathi 6?

स्वतःच्या एन्ट्रीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी काजलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. तिने लिहिलं, “मी बिग बॉसमध्ये जातेय ही चर्चा मला आवडली, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. पण मला स्पष्ट करायला आवडेल की, या सीझनमध्ये तरी मी बिग बॉसच्या घरात जात नाहीये.”

इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण, काही वेळातच काजलने ही पोस्ट चक्क डिलिट केली आहे. त्यामुळे ती खरंच शोमध्ये जात नाहीये की, हे चॅनेलच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून लपवलं जातंय? याबद्दल आता नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

काजलच्या या ‘ये-जा’ प्रकारामुळे चाहते मात्र कन्फ्युज झालेत. पोस्ट डिलीट करण्याआधी अनेक चाहत्यांनी “तू आली असती तर मज्जा आली असती” अशा कमेंट्स केल्या होत्या. वैयक्तिक आयुष्यात काजलने मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच प्रतीक कदम याच्याशी लग्न केलं असून, ती सध्या ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता ११ जानेवारीलाच सत्य काय ते समोर येईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही