Share

पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का! ऐन निवडणुकीत ‘या’ मित्रपक्षाची माघार; म्हणाले – “आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी नाही!”

Major setback for Ajit Pawar in Pune as ally Sachin Kharat withdraws from civic polls, citing lack of respectful seat allocation and ideological differences.

Published On: 

Major setback for Ajit Pawar in Pune as ally Sachin Kharat withdraws from civic polls, citing lack of respectful seat allocation and ideological differences.

🕒 1 min read

पुणे – राजकारणात मैत्री आणि युती तुटायला वेळ लागत नाही, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पुणेकरांना आला. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा (Pune Election 2026) धुरळा उडत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जोरदार धक्का बसला आहे. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून आधीच पुण्याचे वातावरण तापलेलं असताना, आता थेट मित्रपक्षानेच निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. “आम्ही अजितदादांकडे सन्मानपूर्वक जागांची मागणी केली होती, पण आमच्या पदरी निराशाच पडली,” असा आरोप करत खरात यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर, आता या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला आमचा पाठिंबा नसेल, असंही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

Sachin Kharat withdraws from civic polls

“दोन पावलं मागे हटलो तरी चालेल, पण…”

सचिन खरात यांनी आपली भूमिका मांडताना थेट तत्त्वांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतंच चुकीचं काम करणार नाही. दोन पावलं मागे आलो तरी चालेल, पण तत्वांशी तडजोड शक्य नाही.” सत्तेसाठी लाचारी न पत्करता त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कुख्यात टोळीतील तीन गुंडांनी राष्ट्रवादीचे एबी फॉर्म भरल्याने वाद निर्माण झाला होता. तेव्हा अजित पवारांनी (Ajit Pawar) हात झटकत, “आमची खरात गटाशी युती आहे, हा उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार आहे,” असं म्हणत गुन्हेगारी उमेदवारांचे खापर सचिन खरातांवर फोडलं होतं. मात्र, आता खरातांनीच मैदानातून काढता पाय घेतल्याने त्या ‘गुन्हेगार’ उमेदवारांचं काय होणार? आणि दादांची ही खेळी त्यांच्यावरच उलटली का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही