Share

बाळा नांदगावकर ‘बडवे’, संदीप देशपांडेंनाही संपवण्याचा डाव? संतोष धुरींच्या आरोपाने मनसेत भूकंप!

Santosh Dhuri alleges Bala Nandgaonkar is conspiring against Sandeep Deshpande in MNS. Deshpande denies rumors of leaving the party.

Published On: 

Major setback for MNS as senior leader Santosh Dhuri joins BJP, citing lack of respect within the party; Nitesh Rane played a key role.

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात कधी कुणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल हे सांगता येत नाही, आणि आता खुद्द मनसेच्या (MNS) घरातच ही ठिणगी पडली आहे. मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये गेलेल्या संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आणली आहे. इतकंच नाही तर ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्यावर ‘बडवे’ आणि ‘कटकारस्थानी’ असल्याचा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संदीप देशपांडेंना पक्षातून बाहेर काढण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात असल्याचा दावाही धुरींनी केला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

स्वतःबद्दलच्या नाराजीच्या चर्चांवर संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी अखेर मौन सोडले आहे. “मी नाराज नाही आणि पक्ष सोडून कुठेही जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. धुरींच्या आरोपांवर बोलताना देशपांडे यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “संतोष धुरी काय बोलतोय, यावर मला रिअॅक्ट होण्याची गरज नाही. तो त्याचा दृष्टिकोन असू शकतो. त्याने घेतलेला निर्णय बरोबर की चूक हे येणारा काळच ठरवेल.” देशपांडेंनी धुरींवर थेट टीका करणं टाळलं असलं तरी, ‘मी पक्षातच राहून काम करणार,’ हे सांगून त्यांनी विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

MNS Sandeep Deshpande Reaction

“विठ्ठलाच्या बाजूला बडवे…”

संतोष धुरींचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी थेट राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आसपासच्या नेत्यांवर निशाणा साधला. “बाळासाहेबांच्या वेळी जसे विठ्ठलाच्या बाजूला बडवे होते, तसेच बडवे आता मनसेत काम करत आहेत. बाळा नांदगावकर हेच काम करत असून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला,” असा घणाघात धुरींनी केला.

आणखी २-३ विकेट पडणार?

संतोष धुरींनी फक्त आरोप केले नाहीत, तर एक मोठं भविष्यही वर्तवलं आहे. “निवडणुकीआधी मनसेचे आणखी २-३ मोठे चेहरे पक्ष सोडतील,” असा दावा त्यांनी केला आहे. तसंच, मुंबईत मनसेला ५२ जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील जेमतेम ७-८ जागाच निवडून येतील, असं गणित मांडत त्यांनी मनसेच्या ‘मिशन मुंबई’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या