🕒 1 min read
Virat Kohli- “किंग इज बॅक” हे फक्त सोशल मीडियावर बोलायच्या गोष्टी नाहीत, तर प्रत्यक्षात विराट कोहलीची (Virat Kohli) क्रेझ काय असते, याचा थरारक अनुभव आज वडोदऱ्यात आला. एअरपोर्टवर पाऊल ठेवताच असं काही घडलं की सुरक्षा रक्षकांचीही भंबेरी उडाली! राजकारणी असो किंवा सेलिब्रिटी, गर्दी जमवणं सोपं असतं, पण एका झलकसाठी वेडं होणारं पब्लिक फक्त विराटच कमवू शकतो, हे पुन्हा सिद्ध झालंय.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला वनडे सामना ११ जानेवारीला वडोदरा येथे रंगणार आहे. यासाठी विराट आज वडोदऱ्यात लँड झाला. काळा टी-शर्ट आणि डोळ्यावर काळा चष्मा… विराटचा हा ‘स्वॅग’ पाहताच एअरपोर्टबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. “कोहली… कोहली”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गर्दी इतकी बेभान झाली होती की, सुरक्षा रक्षकांना कडे करून विराटला गाडीपर्यंत सुरक्षित न्यावं लागलं. चाहत्यांच्या या प्रेमाचा व्हिडीओ आता आगीसारखा व्हायरल होतोय.
पिक्चर अभी बाकी है…
विराटची ही क्रेझ उगाच नाहीये. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने दिल्लीकडून खेळताना गोलंदाजांची पिसं काढली. अवघ्या दोन सामन्यांत २०८ धावा कुटल्या! आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ तर गुजरातविरुद्ध ७७ धावांची आतषबाजी केली. इतकंच नाही तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा सर्वात वेगाने पार करत त्याने क्रिकेटच्या देवाचा, म्हणजेच सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला आहे.
आता लक्ष ऐतिहासिक रेकॉर्डकडे
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३०२ धावा करणाऱ्या विराटकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त २५ धावांची गरज आहे. ही कामगिरी करताच सचिन आणि संगकाराच्या पंगतीत बसणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरेल. त्यामुळे ११ जानेवारीला वडोदऱ्याच्या मैदानात विराटची बॅट तळपणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Virat Kohli Viral Video Link below
https://x.com/ANI/status/2008834868558594152?s=20
India’s ODI squad against New Zealand
भारताचा एकदिवसीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यात प्रचाराचा ‘राडा’; शिंदेंच्या शहराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक, महिला उमेदवार जखमी!
- ‘ज्यांनी मुलाला पाडलं, त्यांच्याशीच मैत्री?’; शेलारांनी राज ठाकरेंच्या थेट वर्मावरच बोट ठेवलं!
- प्रचाराचा ‘धूर’ निघाला! फटाक्यांमुळे इमारतीला आग; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “हे मूर्ख लोक…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












