Share

निवडणुकीनंतर मोठी ‘उलथापालथ’? अजितदादांनी एका वाक्यात ‘विषय’ संपवला; म्हणाले, “राजकारणात कोणीच…”

Ajit Pawar hints at a possible reunification of NCP factions, stating “no permanent enemies in politics” while criticizing BJP’s governance in Pune.

Published On: 

Ajit Pawar statement about sharad pawar

🕒 1 min read

पुणे – काका-पुतण्याचं भांडण हे खरंच आहे की हा सगळा ‘मिळीभगत’चा खेळ? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हाच प्रश्न हॉट टॉपिक आहे. त्यातच आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी असं काही विधान केलंय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एक होणार का? यावर दादांनी दिलेले उत्तर विरोधकांची झोप उडवणारे आहे.

नेमकं काय म्हणाले अजितदादा? 

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अजित पवारांनी एकत्र येण्याबाबत अतिशय सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, “राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. यावरून काय ओळखायचं ते ओळखा.” सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण व्यस्त असल्याने याचा विचार केला नाही, पण “दोन्ही बाजूचे खालचे कार्यकर्ते मात्र यामुळे समाधानी आहेत,” असं सांगायलाही ते विसरले नाहीत. अजितदादांच्या या विधानामुळे पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजतंय, अशी चर्चा आता रंगली आहे.

Ajit Pawar on NCP Sharad Pawar Reunion

दादांनी फक्त संकेच दिले नाहीत, तर हिशोबही मांडला…

पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरही अजित पवारांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. “१० वर्षांपूर्वी जिथे १० मिनिटं लागायची, तिथे आता दीड तास लागतो. पुणेकरांच्या आयुष्यातील ३-३ तास ट्रॅफिकमध्ये वाया जात आहेत,” अशा शब्दांत त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Election 2026) कारभाराचे वाभाडे काढले.

इतकेच नाही तर, “पुण्यात खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ११५० कोटींची तरतूद केली, तरी रस्ते खराबच का? विकासासाठी पाऊण लाख कोटींचा निधी असताना फक्त ६५० कोटीच खर्च झाले, बाकीचे ५०० कोटी पडून राहिले,” असा गंभीर आरोप करत त्यांनी भाजपच्या ‘विकासकामांची’ पोलखोल केली.

दुसरीकडे, मुलगा पार्थ पवार यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीच चुकीचं काम करण्यासाठी दबाव आणला नाही. जर मला या व्यवहाराची माहिती असती, तर मी तो होऊच दिला नसता,” असं म्हणत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या