Share

आईशी लफडं, मुलाने ‘बिंग’ फोडलं; संतापलेल्या काकाने केला 13 वर्षीय पुतण्याचा थरारक शेवट!

Shocking incident in Dharashiv: Uncle kills 13-year-old nephew to hide illicit relationship with the boy’s mother. Accused arrested within 24 hours.

Published On: 

After Santosh Deshmukh massacre, two brothers brutally murdered in Beed

Dharashiv Crime– रक्ताचं नातं, प्रेमाचा ओलावा… हे शब्द आता फक्त पुस्तकातच उरलेत की काय? अशी शंका यावी, इतकी भयानक घटना धाराशिवमध्ये (Dharashiv) घडली आहे. वासनेच्या आहारी गेलेल्या माणसाला नात्याची कदर नसते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या १३ वर्षीय पुतण्याचा काकानेच अत्यंत निर्घृणपणे काटा काढल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात ओमकार देविदास कांबळे हा आपल्या भावजयीसोबत (वहिनी) सालगडी म्हणून कामाला होता. मात्र, दीर आणि भावजय यांच्यात अनैतिक संबंध जुळले होते. पण या पापाच्या खेळात १३ वर्षीय कृष्णा सदानंद कांबळे हा अडसर ठरत होता. आपली आई आणि काका यांच्यात काहीतरी चुकीचं सुरू आहे, हे कृष्णाला समजलं होतं. आणि हीच गोष्ट त्याच्या जीवावर बेतली.

कृष्णा हा आई आणि काकाच्या ‘प्रेमप्रकरणाची’ माहिती आपल्या वडिलांना (सदानंद कांबळे) देत असे. आपलं बिंग फुटतंय आणि कृष्णामुळे आपल्या संबंधात बाधा येतेय, याचा राग ओमकारला अनावर झाला. याच रागातून १ जानेवारीला दुपारी मोटारीचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने ओमकारने कृष्णाला तामलवाडी साठवण तलावाजवळ नेले. तिथे संधी मिळताच त्याने कृष्णावर कुऱ्हाडीने सपासप वार केले आणि मृतदेह गवतात फेकून पसार झाला.

सुरुवातीला ५ जानेवारीला मुलाचा मृतदेह आढळल्याने अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पण तामलवाडी पोलिसांना संशय आला आणि त्यांनी वेगाने सूत्रे हलवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी काका ओमकारला उमरगा तालुक्यातील काळसुर गावातून बेड्या ठोकल्या. पोलिस चौकशीत त्याने आपल्या पापाची कबुली दिली असून आता त्याला गजाआड करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही