Share

नाव बदललं, भाषा बदलली, बापाचं नावही खोटं; ३४ वर्षांनी ‘असा’ अडकला बायकोचा खुनी!

Delhi Crime Branch arrested a murder convict after 34 years. He changed his identity, name, and even father’s name to evade police, living in Ludhiana as a carpenter.

Published On: 

Delhi Crime Branch arrested a murder convict after 34 years. He changed his identity, name, and even father's name to evade police, living in Ludhiana as a carpenter.

Delhi Crime Branch- गुन्हा लपवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? नाव बदललं, गाव सोडलं, नवीन भाषा शिकला… इतकंच काय, चक्क बापाचं नावही बदललं! पण म्हणतात ना, ‘कायद्याचे हात लांब असतात’, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. तब्बल ३४ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

ही फिल्मी स्टोरी आहे योगेंद्र उर्फ जोगिंदर सिंग याची. १९९२ मध्ये दिल्लीत त्याने स्वतःच्या पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपही झाली. पण २००० मध्ये पॅरोलवर बाहेर आला आणि जो पळाला, तो थेट आता २०२६ मध्येच पोलिसांच्या हाती लागला! पॅरोल संपल्यावर परतण्याऐवजी त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करत ओळख पुसून टाकली होती.

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हा महाशय हिमाचल, बंगाल, बिहार आणि कर्नाटक फिरला. शेवटी २०१२ मध्ये तो पंजाबच्या लुधियानामध्ये स्थिरावला. तिथे त्याने आपली ओळख पूर्णपणे बदलली. नाव बदलून ‘जोगिंदर सिंग’ केलं, वडिलांचं नावही कागदोपत्री बदललं. इतकंच नाही तर संशय येऊ नये म्हणून अस्खलित पंजाबी भाषा शिकली आणि सुतारकाम (Carpenter) सुरू केलं. बनावट आधार कार्ड आणि व्होटर आयडीच्या जोरावर तो २६ वर्षे बिनधास्त जगत होता.

पण दिल्ली क्राईम ब्रँचच्या जिद्दीपुढे त्याचं हे बहरूपीयं रूप टिकले नाही. पोलिसांनी तब्बल ५०० लोकांची प्रोफाईल तपासली. अखेर ५ जानेवारी २०२६ रोजी लुधियानामध्ये पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच योगेंद्रने बाईक दामटली, सिनेस्टाईल पाठलाग झाला, पण अखेर तो पकडला गेलाच. “मला वाटलं पोलीस विसरले असतील,” अशी कबुली त्याने अटकेनंतर दिली. पण कायद्याच्या डायरीत गुन्हेगाराला माफी नसते, हेच या घटनेने सिद्ध केलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही