Prashant Koratkar । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बऱ्याच तपासानंतर तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. एकीकडे पोलिसांकडून शोध घेतला जात होता तर दुसरीकडे तो दुबईला गेल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार त्याला पोलिसांकडून तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत कोरटकरचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो कॉल माझा नव्हता, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला होता.
Prashant Koratkar Arrested
अखेर आज त्याला अटक केली आहे. कोरटकरने अगोदर कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. उच्च न्यायालयातही कोरटकरचा जामिनासाठीचा केलेला अर्ज केला. फेटाळण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :